वादग्रस्त पोस्ट टाकणारा मनपा कर्मचारी निलंबित

झाड लावा अन्‌ क्वॉर्टर फ्री मिळवा

नगर – पर्यावरणाचा होत चालेला ऱ्हास रोखण्यासाठी शासनाने झाडे लावा अभियान सुरू केले आहे. त्यासाठी प्रशासनासह विविध संघटना देखील प्रयत्न करीत असतांना महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाने एक वेगळीच योजना जाहिर केली. पावसाळ्यात एक झाड लावा, वाढवा आणि हिवाळ्यात एक क्वार्टर मोफत मिळवा, ही योजना व्हॉटस्‌ऍप ग्रुपवर टाकल्याने एकच खळबळ उडाली. या वादग्रस्त पोस्टनंतर आयुक्‍तांनी या स्वच्छता निरीक्षकास निलंबित केले.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या व्हॉटस्‌ ऍप ग्रुपवर स्वच्छता निरीक्षक कुमार देशमुख या अधिकाऱ्याने झाड लावा, क्वार्टर मिळवा’ या योजनेची घोषणा केली. पावसाळ्यात लावलेले झाड वाढवा आणि हिवाळ्यात एक क्वार्टर मोफत मिळवा, या सुवर्णसंधीचा लाभ घ्या, असे या अधिकाऱ्याने आपल्या व्हॉटस्‌ ऍपवरील मॅसेजमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे ही योजना फक्त मुकादमांसाठी असल्याचेही म्हटले आहे.ही अनोखी घोषणा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

महापालिका कर्मचारी युनियनने थेट आयुक्तांकडेच तक्रार केली. त्यानंतर आयुक्‍तांनी देशमुख यांना निलंबित केले. हा संदेश संबंधित अधिकाऱ्याने मुकादमांना उद्देशून पोस्ट केला आहे. महापालिकेच्या विविध व्हॉट्‌सअप ग्रुपवर हा संदेश व्हायरल झाला आहे. महापालिका कर्मचारी युनियननेही याची गंभीर दखल घेतली आहे. कर्मचाऱ्यांना व्यसनाधीन बनविण्यासाठी अधिकारी प्रोत्साहन देत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.