मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणानी मुंबई पोलिसांना धोकादायक व्यक्ती देशात आला असल्याची माहिती दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. दरम्यान, एनआयएदिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित दहशतावाद्याला ताब्यात घेतलं आहे. एनआयएकडून दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशारा देण्यात आला होता. संशयित दहशतवादी सरफराज मेमनला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याची माहिती एनआयएने मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना याबाबत माहिती पुरवली होती. एनआयएने दिलेल्या माहितीच्या आधारे इंदूर पोलिसांनी सरफराज मेमनला ताब्यात घेतले आहे. सरफराजच्या चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली आहे.
सरफराज मेमन हा चीन आणि पाकिस्तानमधून ट्रेनिंग घेऊन भारतात आल्याची माहिती एनआयएने दिली होती. या माहितीच्या आधारे एनआयएने पोलिसांना सतर्क राहण्याचे आवाहनही केले होते. एनआयएच्या माहितीच्या आधारे मुंबई पोलीस, एटीएस तसेच इतर यंत्रणाकडून तपास सुरु होता, आता त्यामध्ये यश आले असून पोलिसांनी संशयित सरफराज मेमनला ताब्यात घेतले आहे.
एनआयएकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा ई-मेल पाठवण्यात आला होता. त्यानुसार, तपास यंत्रणाकडून तपास सुरु होता. संबंधित संशयित इसम सरफराजला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली असून त्यांची चौकशी करण्यात येईल. महाराष्ट्र एटीएस संशयित सरफराज मेमनची चौकशी करणार आहे.