मुंबई – ‘सिटाडेल’ या आगामी प्राइम व्हिडिओ वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला आहे. यात प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत रिचर्ड मॅडन आणि स्टॅनले टुसी देखील आहेत.
View this post on Instagram
या शोमध्ये तुम्हाला भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे. प्रियांका स्वतःही जबरदस्त अॅक्शन स्टंट करताना दिसणार आहे. याआधी प्रियांकाने शोमधील तिचा फर्स्ट लुकही शेअर केला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडन यांची झलक दाखवण्यात आली आहे. टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्स आहेत. यामध्ये प्रियांका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. यात लेस्ली मॅनविले देखील आहेत. त्याचे पहिले दोन भाग २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होतील. त्याचा ट्रेलर 1 मार्च रोजी रिलीज होणार आहे. याआधी सोमवारी प्रियांका चोप्राने सिटाडेलचा फर्स्ट लुक शेअर केला होता.
याशिवाय चाहत्यांना प्रियंका ‘लव्ह अगेन’मध्येही दिसणार आहे, ज्यामध्ये ती सॅम ह्यूघनसोबत दिसणार आहे. याचे दिग्दर्शन जिम स्ट्रॉस यांनी केले आहे. 12 फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे