सासवड -पुरंदर तालुक्यातील मांढर येथील 75 वर्षीय एका ज्येष्ठ नागरिकाचा सोमवारी (दि.1) पहाटे सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या ज्येष्ष्ठ नागरिकाला निमोनियाचा आजार असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. किरण राऊत यांनी सांगितले आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिक करोना संशयित असल्याची अफवा पसरली होती.
याबाबत डॉ. किरण राऊत यांनी सांगितले की, मृत्यू झालेल्या व्यक्तीला सासवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू त्यांना सर्दी, खोकल्याचा जास्त त्रास होऊ लागल्याने रविवारी रात्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या व्यक्तीला दमा आणि उच्च रक्तदाबाचाही आजार होता. त्यात त्यांचा निमोनिया झाल्याने मृत्यू झाला आहे. तरीही त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.