पुणे – धनकवडी येथील बालाजीनगर उड्डाणपुलाखाली संशयित बॅग आढळून आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले असून बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या बॅगेची बॉम्बशोधक पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट देण्यात आला आहे.