Sushma Andhare On Devendra Fadnavis – देवेंद्र फडणवीस यांनी बाहेरचे पक्ष फोडून अनेकांना आपल्या पक्षाबरोबर घेऊन त्यांना अनेक सत्तेची महत्वाची पदे दिली. त्यामुळे भाजपची अवस्था आज घरचे उपाशी आणि कॉंग्रेसचे तुपाशी अशी झाली आहे.
अशी घणाघाती टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी गुजराती लोकांचे मुनीम म्हणून काम सुरू करावे असेही त्यांनी म्हटले आहे. । Sushma Andhare On Devendra Fadnavis
सुषमा अंधारे यांनी सिंधखेड राजा ते शिवतीर्थ अशी मुक्त संवाद यात्रा काढली आहे. त्यांची ही यात्रा नगरमध्ये आली त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, फडणवीस हे पंकजा मुंडे यांना संपवण्याचे काम करीत आहेत. त्यांना राज्यसभा देण्याऐवजी ती कॉंग्रेस मधून आलेल्या अशोक चव्हाणांना दिली गेली.
भाजपमध्ये बावनकुळे, विनोद तावडे अशांना संपवण्याचे काम सुरू आहे. तावडे फडणवीसांच्या तावडीतून सुटले, बावनकुळे यांनी फडणवीसांची भाटगीरी करून आपले राजकारण सुरू ठेवले आहे. । Sushma Andhare On Devendra Fadnavis
फडणवीसांनी एकनाथ खडसे यांनाही संपवण्याचे प्रयत्न केल्याने त्यांना पक्ष सोडावा लागला. पंकजा मुंडे यांनी अन्याय सहन करू नये असे आवाहनही त्यांनी केलेे.
निखील वागळे यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी गृहमंत्री असलेले फडणवीस यांनी त्यांना संयमाने बोलण्याचा सल्ला दिला होता. पण राणे आणि त्यांची दोन वाह्यात मुले जनक्षोभ माजवणारी विधाने करतात त्यावेळी गृहमंत्री त्यांना हा सल्ला का देत नाहीत.
असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रातील सौहार्दाचे वातावरण बिघडवण्याचे काम फडणवीस आणि त्यांची ब्रिगेड करीत आहे असा आरोपही त्यांनी केला. । Sushma Andhare On Devendra Fadnavis