कृतिसाठी सुशांत सिंहने सोडला “ऍव्हेंजर्स..’चा स्पेशल स्क्रीनिंग

बॉलिवूडमध्ये “अव्हेंजर्स एंडगेम’चा फिव्हर वाढायला लागला आहे. या सिनेमाची क्रेझ इतकी प्रचड वाढली आहे की बॉलिवूडमधील प्रेक्षकच काय पण ऍक्‍टर, डिरेक्‍टर, प्रोड्युसर सर्वांनीच या सिनेमाचे तोंड भरून कौतुक केले आहे. मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटीजसाठी “ऍव्हेंजर्स…’च्या स्पेशल शो चे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते.

अक्षय कुमार, दिशा पटणी, तारा सुतारिया, अदा शर्मा, अनन्या पांडे, टायगर श्रॉफ, कृति सेनान आणि सुशांत सिंह राजपूत सिनेमा बघण्यासाठी आले होते. पण सुशांत सिनेमा अर्धवट टाकून मध्येच निघून गेला. त्याने असे मध्येच निघून जाण्याला कृति सेनान कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. कृति आपली बहिण नुपूरसह या स्पेशल स्क्रीनिंगला आली होती. सुशांत येण्यापूर्वीच कृति आपल्या सीटवर बसली होती. त्यावेळी दोघेही एकमेकांच्या समोर आले नव्हते.

मात्र इंटरव्हलदरम्यान दोघे एकमेकांसमोर येण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र सुशांत 15 मिनिट आआगोदरच थिएटरमधून बाहेर पडला. त्यामुळे कोणतीही अडचणीची वेळ दोघांवरही आली नाही. सुशांत आणि कृति यांच्यात अफेअर होते. त्यांनी “राबता’मध्ये एकत्र कामही केले होते. नंतर त्यांच्यात ब्रेकअप झाला, असे बऱ्याच दिवसांपूर्वीपासून ऐकिवात आहे. सध्या सुशांत सारा अली खानला डेट करतो आहे, असेही समजले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.