Suryakumar Yadav – सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियाचा टी-२० क्रिकेटमधील सर्वात स्टार फलंदाज बनला आहे. तो मैदानात उतरल्यानंतर विरोधी संघांच्या गोलंदाजांना मोठ्या अडचणी निर्माण होतात. सूर्यकुमारच्या ३६० डिग्री फलंदाजीच्या कौशल्यामुळे त्याला भारताचा एबी डिव्हिलियर्स म्हटले जात आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने गोलंदाजांना चांगलेच धुतले. त्याने आपल्या टी-२० क्रिकेटमधील तिसरे शतक झळकावले आहे. श्रीलंकेविरुद्ध ५१ चेंडूत ११२ धावा केल्यानंतर सूर्यकुमार यादवने नवीन विक्रम रचला आहे. सूर्यकुमारने गेल्या सहा महिन्यांच्या काळात तिसरे टी-२० शतक झळकावले आहे. त्याच्या श्रीलंकेविरुद्धच्या शतकीय खेळीने भारताने हा सामना ९७ धावा राखून जिंकला होता.
दसून शनाका ९८ धावांवरच बाद झाला असता पण रोहितने दाखवलं मोठं मन; तुम्हीही त्याचे कौतुकच कराल!
सूर्यकुमार यादव अत्यंत कमी कालावधीतच भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज बनला आहे. त्याच्या फलंदाजी करण्याच्या शैलीला चाहते मोठ्या प्रमाणात पसंत करत आहेत. सूर्यकुमारने श्रीलंकेविरुद्धच्या राजकोट येथील महत्वाच्या शेवटच्या टी-२० सामन्यात शतकीय खेळी केली होती. त्याने ५१ चेंडूत ७ चौकार आणि ९ षटकारांच्या साहाय्याने ११२ धावा केल्या होत्या. त्यामुळे सूर्यकुमारला त्याच्या या खेळीचा आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.
Gautam Gambhir । “विराटची सचिनशी तुलना करणे योग्य नाही…”, गंभीरने सांगितलं हे मोठं कारण
सूर्यकुमार यादवने टी-२० क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या ४५ सामन्यात १८० पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने आणि ४६.४च्या सरासरीने १५७८ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव सध्या आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ९०८ रेटिंग गुणांसह अव्व्ल स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या शतकाअगोदर त्याचे गुण ८८३ एवढे होते. त्यामुळे त्याला त्याच्या शतकीय खेळीचा मोठा फायदा झाल्याचे दिसत आहे.
टीम इंडिया सज्ज! टी-20 नंतर आता वनडे मालिका जिंकण्याचे लक्ष्य; उद्या दुसरा एकदिवसीय सामना!
आयसीसीच्या फलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत ९०० पेक्षा अधिक गुण मिळवणारा सूर्यकुमार यादव हा तिसराच खेळाडू आहे. त्याच्याअगोदर टी-२० क्रिकेटच्या क्रमवारीच्या इतिहासात इंग्लंडचा डेवीड मलान व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंच यांनाच ९०० पॉईंट्स कमावता आले आहेत. त्याचबरोबर अशी कामगिरी करणारा सूर्यकुमार पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. भारताच्या विराट कोहलीने ८९७ पर्यंत व लोकेश राहुलने ८५४ पर्यंत रेटिंग पॉईंट्सपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे सूर्यकुमारच्या या कामगिरीमुळे त्याचे जोरदार कौतुक होताना दिसत आहे.
Surya kumar yadav is on 908 icc points 🔥
Surya Kumar Yadav surpass Aaron Finch in All time T20 rankings 🔥🔥#T20WorldCup #SuryakumarYadav#Sachin pic.twitter.com/ijJKlZHSxn— Rakesh (@Cricket0079) January 11, 2023