मुंबई :– दक्षिण आफ्रिकेचा मिस्टर 360 असे संबोधले जात असलेला फलंदाज एबी डिविलियर्सप्रमाणेच भारतीय संघाचा सूर्यकुमार यादवही मोठा फलंदाज बनेल, तितकी क्षमता त्याच्याकडे निश्चितच आहे, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने सूर्यकुमारचे कौतुक केले आहे.
सध्याच्या भारतीय संघातील फलंदाजीची ताकद पाहता त्यांना चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमारची नितांत गरज आहे. त्याने गेल्या तीन मोसमांत तसेच नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेत अफलातून कामगिरी केली आहे.
तसेच त्याने जेव्हा भारतीय संघात संधी मिळाली तेव्हाही आपली गुणवत्ता सातत्याने सिद्ध केली आहे, त्यामुळेच भविष्यात तो भारताच्या मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वासही पॉंटिंगने व्यक्त केला आहे.