कार्ला – स्व पै पंढरीनाथ हरिभाऊ सातकर प्रतिष्ठान व पै किशोर पंढरीनाथ सातकर युवा मंचाच्या वतीने बैलगाडा स्पर्धेत आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत वेहरगाव येथील सुरेश हुकाजी गायकवाड व किवळे येथील स्वप्नील बाबाजी तरस यांंच्या मॉनस्टार लक्ष्या व वजीर या बैलजोडीने घाटाचा राजा, मेघा फायनल व फायनल असा तिहेरी मुकुट पटकावला.
या स्पर्धेत मावळ मुळशीसह पुणे जिल्ह्यातील २५६ बैलगाडीने सहभाग घेतला होता. या बैलगाडा शर्यतीत वेहरगाव येथील सुरेश हुकाजी गायकवाड व किवळे येथील स्वप्नील बाबाजी तरस यांंच्या मॉनस्टार लक्ष्या व वजीर या बैलजोडीने घाटाचा राजा, मेघा फायनल व फायनल असा तिहेरी मुकुट पटकावला. द्वितीय क्रमांक दत्तात्रय साबळे, अमोल निंबाळकर तर तृतीय क्रमांक बाबुराव वायकर, स्वामी गायकवाड, चतुर्थ क्रमांक ओंकारेश्वर मित्रमंडळ व नामदेव कोंडे, पाचवा क्रमांक शुभम गायकवाड व तुषार कवडे, सहावा क्रमांक राजाराम कुटे व दिलीप उंबरकर यांनी पटकावला.
या स्पर्धेत सोन्याची अंगठी, दुचाकी, एलईडी टीव्ही, चषक व गदा अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. आमदार सुनील शेळके, सिने अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, बाबुराव वायकर, दिपक हुलावळे, साहेबराव कारके, निवृती शेटे, बाळासाहेब भानुसघरे, सरपंच विजय सातकर यांंच्यासह मावळ तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.
या बैलगाडा शर्यतीचे आयोजन स्व. पै. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर प्रतिष्ठान, किशोर सातकर मित्रपरिवार व कान्हे फाटा ग्रामस्थ यांंच्या वतीने करण्यात आले होते.