कर्जत – नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी शासकीय योजनचा लाभ मिळावा यासाठी ४५० नागरिकांना पंतप्रधान आयुष्यान भारत योजनेचे कार्ड काढून त्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते केतन बेलोसे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.
प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळतात. मात्र त्यासाठी पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढणे अनिवार्य आहे. सामाजिक कार्यकर्ते केतन बोलोसे यांनी नेवाळी, आवळस, मोहिली येथे आयोजित केलेल्या शिबिरात ग्रामस्थ, युवक, युवती व महिला यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन ४५० योजनेच्या कार्डचे वाटप करण्यात आले.
आपल्या भागातील नागरिकांना खासगी हॉस्पिटल मोफत उपचारासाठी सेवा देण्याचे काम केतन बेलोसे यांच्याकडून करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.