नवी दिल्ली – अनेक राज्यांच्या राज्यपालांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम केलेले सर्वोच्च न्यायालयाचे वकील विकास बनसोडे यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मुख्यालयात बनसोडे यांनी पक्षप्रवेश केला.
ऍड. विकास बनसोडे यांनी कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचे दिवंगत कॉंग्रेस नेते हंसराज भारद्वाज यांच्यासह माजी राज्यपालांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले होते.
ते अनेक विरोधी नेत्यांना ओळखतात आणि म्हणूनच भाजपमध्ये सामील होण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्यापैकी काहींची झोप उडाली आहे, असे सी. टी. रवी म्हणाले. तसेच बनसोडे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने दक्षिण भारतात पक्ष मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.