पाकिस्तानकडून भारताच्या राफेल विमानाच्या पुजेचे समर्थन

राफेलची पुजा धर्माप्रमाणेच असल्याचे पाकच्या लष्करप्रमुखांचे वक्‍तव्य

इस्मामाबाद : जम्मू आणि काश्‍मीरविषयी केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव वाढत गेला आहे. त्यात दसऱ्याच्या दिवशी भारताला पहिले राफेल विमान मिळाले. परंतू, हे विमान भारतात येण्या अगोदरच त्यांच्यासोबत वेगळ्या वादाची झालर त्याला लागली दसऱ्याच्या दिवशी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शस्त्रपुजा म्हणून राफेलचीदेखील पुजा केली त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, आता या राफेलच्या पुजेविषयी पाकिस्तानकडून मोठे विधान समोर आले आहे. भारताकडून करण्यात आलेल्या राफेलच्या पुजेला पाकने समर्थन दिले आहे.

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी भारताच्या राफेल विमानाच्या पुजेचे समर्थन केले आहे. त्यांनी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘राफेल विमानाची पुजा ही शस्त्रास्त्र पूजा म्हणून केली असल्याचे सांगत त्यांच्या कृतीला पाठिंबा दर्शवला आहे. एवढेच नाही तर त्यांनी ‘राफेल विमानाची पूजा करणे यात काहीही चुकीचे नाही कारण ते त्यांच्याधर्मानुसार आहे’ असेही त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी याविषयी एक ट्‌विट केले आहे. त्यात, “‘राफेल विमानाची पुजा ही शस्त्रास्त्र पूजा म्हणून केली.” कृपया लक्षात ठेवा … हे फक्‍त एक शस्त्र नाही तर वस्तुतः हे मशीन हाताळणाऱ्या व्यक्तीची क्षमता, आवड आणि दृढनिश्‍चय महत्त्वाचे आहे. आम्हाला आमच्या पीएएफ शहीदांचा अभिमान आहे. पाकिस्तानकडून हे वक्तव्य अशा वेळी करण्यात आले आहे जेव्हा दोन दक्षिण आशियाई देशांमधील तणाव उच्च शिखरावर गेला आहे. जम्मू-काश्‍मीरच्या विशेष दर्जाबद्दल भारताने केलेल्या कारवाईबाबत पाकिस्तानमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.