नवी दिल्ली – कोळसा मंत्रालयाने 28 ऑक्टोबरला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पांना 22 लाख टन कोळशाचा पुरवठा करून उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
ट्विट संदेशाद्वारे केंद्रीय मंत्री म्हणाले, की या एकूण कोळशापैकी 18 लाख टन कोळशाचा पुरवठा कोल इंडिया या कंपनीने केला आहे. सर्व कोळसा कंपन्यांचे अभिनंदन करताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांना अधिकाधिक कोळसा उत्पादन आणि पुरवठा करण्याची विनंती केली.