सीलबंद कॅनमधूनच दूध पुरवठा करा
पुणे, दि. 21 – सरकारी डेअरीमधून दुधाचा पुरवठा सीलबंद बाटल्यांद्वारे किंवा सीलबंद कॅनद्वारे न होता सील नसलेल्या चाळीस लिटरच्या कॅनमधून दूध पुरवठा होत आहे. त्यामुळे दुधाची क्वालिटी ठीक नसते. त्यात बर्याच प्रमाणात पाणी मिश्र केलेले आहे असे ग्राहकांचे म्हणणे आहे. शिवाय कॅनमध्ये दूध चाळीस लिटरऐवजी 1-2 लिटर कमीच असते, असे निदर्शनास आले आहे. म्हणून सर्व सरकारी दूध केंद्रावर सीलबंद कॅनमधून दूध आले तरच केंद्रप्रमुख दुधाचे वाटप करण्याची जबाबदारी स्वीकारतील अन्यथा दूध विक्री करणार नाहीत.
ढगांवर गोळीबार करून पाऊस पडेल
अहमदाबाद – यापुढे ढगांवर गोळीबार करून कृत्रिम पाऊस पाडणे शक्य होणार आहे. मात्र या गोळ्या खास पेपरमिंटपासून तयार कराव्या लागतील, असे एक शेती शास्त्रज्ञ म्हणाले. यापुढे जाऊन हे शेती शास्त्रज्ञ म्हणाले, गोळ्या झाडून पाऊस जसा पाडता येईल तसा चुनखडी वापरून तयार केलेल्या गोळ्या झाडून पाऊस थांबविताही येईल. हा शोध इंदर दास रतनू यांनी लावला असून ते मेहसाना जिल्ह्यातील पालपूर येथे बँक ऑफ इंडियातर्फे शेती संशोधन करतात. हा शोध त्यांनी अबूच्या पाहाडावर गेले दीड वर्ष प्रयोग करून लावला आहे.