सुपरनोव्हाज अंतिम फेरीत

शारजा -दीप्ती शर्मा आणि हरलीन देओल यांच्या कडव्या लढतीनंतरही सुपरनोव्हाजने ट्रेलब्लेझर्सचा अवघ्या 2 धावांनी पराभव करत महिलांच्या चॅलेंजर आयपीएल टी-20 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यांतील पराभवानंतरही ट्रेलब्लेझर्सनेही अंतिम फेरी गाठली.

विजयासाठी 147 धावांची गरज असताना सुपरनोव्हाजने राधा यादव व शकिरा सेलमन यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर निसटता विजय मिळवला. अंतिम सामना सोमवारी होणार आहे.

तत्पूर्वी, चामरी अटापटूचे वादळी अर्धशतक तसेच प्रिया पुनिया व कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर सुपरनोव्हाजने ट्रेलब्लेझर्सविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 6 गडी गमावून 146 धावा केल्या.

हरमनप्रीतने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रिया पुनिया व चामरी अटापटूने 89 धावांची सलामी देत थाटात सुरुवात केली. प्रिया स्थिरावल्यानंतर अत्यंत अनावश्‍यक फटका मारून बाद झाली. तिने 37 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या.

त्यानंतर मात्र, कर्णधार हरमनप्रीत व अटापटू या जोडीने संघाचा डाव सावरला. सुरुवातीला एकेरी, दुहेरी धावा घेत त्यांनी धावफलक हलता ठेवला. त्यानंतर अटापटूने अचानक गिअर बदलला व आक्रमक फलंदाजी सुरू केली. तिच्या या अचानक सुरू झालेल्या हल्ल्यासमोर ट्रेलब्लेझर्सच्या गोलंदाज अवाक झाल्या.

तिने डावाची सूत्रे हाती घेत दमदार अर्धशतक साकार केले त्यानंतर मात्र, ती देखील अनावश्‍यक पद्धतीने फटका मारून बाद झाली. अटापटूने आपल्या 67 धावांच्या खेळीत 48 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व तब्बल 4 षटकार अशी आतषबाजी केली.

ती बाद झाल्यावर हरमनप्रीतने एक बाजू लवून धरली होती. मात्र, तिला समोरून साथ मिळाली नाही. जेमिमा रॉड्रीग्ज व शशिकला सिरीवर्धने अपयशी ठरल्या. हरमनही चोरटी धाव घेताना धावबाद झाली. तिने 29 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार व 1 षटकार फटकावताना 31 धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक : 

सुपरनोव्हाज – 20 षटकांत 6 बाद 146 धावा. (चामरी अटापटू 67, हरमनप्रीत कौर 31, प्रिया पुनिया 30, झुलन गोस्वामी 1-17, सलमा खातून 1-25, हरलीन दओल 1-34). ट्रेलब्लेझर्स – 20 षटकांत 5 बाद 144 धावा. (स्मृती मानधना 33, दीप्ती शर्मा नाबाद 43, हरलीन देओल 27, राधा यादव 2-30, शकिरा सेलमन 2-31).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.