बॉलिवूडमधील अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. यातील काही चित्रपट हिट ठरतात, तर काही फ्लॉप होतात. पण काही मोजकेच चित्रपट असे असतात जे प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षे राज्य करतात.
असाच एक चित्रपट 2008मध्ये प्रदर्शित झाला होता. तो चित्रपट म्हणजे आमिर खान “गजनी’. या चित्रपटात आमिर खानने एकदम हटके व्यक्तिरेखा साकारली होती. जी आजही बॉलिवूडमध्ये आयकॉनिक भूमिका मानली जाते. आता 12 वर्षानंतर चित्रपटाचा सिक्वेल “गजनी-2′ येणार असल्याची जबरदस्त चर्चा सुरू आहे. इतकेच नाही तर चित्रपटाच्या नायकाबद्दलही काही गोष्टी समोर आल्या आहेत.
वास्तविक, रिलायन्स एंटरटेनमेंटने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून “गजनी’बद्दल ट्विट केल्यानंतर “गजनी-2’ची चर्चा होण्यास सुरूवात झाली. रिलायन्स एन्टरटेन्मेंटने एक फोटो शेअर केला होता.
ज्यामध्ये लिहिले होते की, “ही पोस्ट गजनीबद्दलची होती, पण आम्हाला काय बनवायचे आहे हे आम्ही विसरलो.’ त्याचबरोबर या फोटोच्या कॅप्शनवर लिहिले आहे की, ” याचा दोष गजनीला द्या’.
आता लोक आमीर खानच्या “गजनी’ अर्थात “गजनी 2′ या चित्रपटाचा सिक्वल म्हणून विचार करत आहेत.
विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेनमेंटने अभिनेता आमिर खानलाही या पोस्टसह टॅग केले आहे. त्यामुळे आमिर खानदेखील “गजनी-2’मध्ये असण्याची शक्यता आहे. त्याच वेळी आमिर खानच्या 55व्या वाढदिवसनिमित्ताने 14 मार्च रोजी “गजनी 2′ अधिकृत घोषण होवू शकते.