जॉन अब्राहमच्या “सत्यमेव जयते 2’चे पोस्टर रिलीज झाले आहे. एरवी ऍक्शन-रोमॅंटिक रोलमध्ये दिसणारा जॉन या सिनेमात फुल्ल ऑफ ऍक्शन रोलमध्येच दिसणार आहे.
“सत्यमेव जयते 2’चा डायरेक्टर मिलाप झवेरीने या सिनेमातील जॉनच्या लुकची तुलना मार्वल पिक्चरचा सुपरहिरो “द हल्क’बरोबर केली आहे.
झवेरीने ट्विटरवर “सत्यमेव…’मधील जॉनचे पोस्टर आणि हल्कचा एक ऍक्शन फोटो शेअर केला आहे. यामध्ये हल्क एक भलामोठा ट्रक दोन्ही हातांनी आडवून धरताना दिसते आहे. जॉनने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये “सत्यमेव जयते 2’च्या पहिल्या पोस्टरचे अनावरण केले होते.
2018 मधील “सत्यमेव जयते’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसाच प्रतिसाद या सिक्वेललाही मिळेल, अशी अपेक्षा आहे. भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्याविरोधात उभा ठाकलेला जॉन यामध्ये आपल्याला दिसणार आहे.
त्याच्याबरोबर दिव्या खोसला कुमार असणार आहे. मोनिशा आडवाणी, मधु भोजवानी, आणि निखील आडवाणी हे अन्य कलाकार असणार आहेत. यांच्या बरोबर मनोज वाजपेयी आणि अम्यारा दस्तुर हे देखील लीड रोलमध्ये असनार आहेत. “सत्यमेव जयते 2′ पुढील वर्षी 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.