दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा सध्या दिग्दर्शक नाग अश्विनच्या आगामी चित्रपटामुळे प्रसिद्धीच्य झोतात आहे. प्रभासच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “साहो’ चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकली होती.
त्यानंतर प्रभास आगामी चित्रपटात पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर काम करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूडमधीा आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ दिसणार आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूर एकत्र दिसले होते.
पण आता या चित्रपटात प्रभास आणि कतरिना कैफची जोडी कशी दिसते हे बघणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.
बाहुबली स्टार प्रभासने या चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या नावाला पसंती दर्शविली आहे. अश्विनी दत्त हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार निर्मात्यांनी या चित्रपटासाठी कतरिनाशीही चर्चा केली आहे. जर आता सर्वकाही ठीक झाल्यास प्रभास आणि कतरिना कैफच्या जोडीबद्दल लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.
दरम्यान, कतरिनाच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सध्या ती आपल्या आगामी “सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 24 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.