पंजाब: निवडणुकीच्या रिंगणात भाजपने सनी देओल यांना घेऊन येऊ दे किंवा सनी लिओनीला, तरी ते जिंकू शकणार नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते राजकुमार चब्बेवाल यांनी केले. ते एका प्रचारसभेत बोलत होते.
राजकुमार चब्बेवाल म्हणाले, नरेंद्र मोदी अपयशी ठरले असून त्यांना पंजाबमध्ये तीन जागांवर उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे मोदींनी गुरुदासपूरमधून सनी देओल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. मात्र भाजपने सनी देओल यांना घेऊन येऊ दे किंवा सनी लिओनीला, काँग्रेसच्या वादळात सर्वजण उडून जातील, असे वक्तव्य राजकुमार चब्बेवाल यांनी केले.
बॉलीवूड अभिनेता सनी देओल याने भाजपमध्ये जाहिररित्या प्रवेश केला आहे. ‘मोदींनी या देशासाठी बरंच काही केलं असून पुढची पाच वर्ष त्यांनाच सत्ता मिळाली पाहीजे’ असे मत सनी देओल याने व्यक्त केले होते. ‘माझे वडील अटल बिहारी वाजपेयींपासून भाजपसोबत जोडले गेले आणि मी नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपसोबत जोडलो गेलोय’ असेही सनी देओल म्हणाला होता. दरम्यान, पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपाच्या तिकीटावर सनी देओल निवडणूक लढवणार आहे.
Raj Kumar Chabbewal,Congress candidate from Hoshiarpur,Punjab: Modi govt has failed. They can't find candidates even for 3 seats in Punjab. They've fielded Sunny Deol in Gurdaspur. BJP can bring Sunny Deol or Sunny Leone,but no one will be able to stand before this 'aandhi'.(2.5) pic.twitter.com/TPkjIPuwMN
— ANI (@ANI) May 3, 2019