मुंबई – बॉलिवूडमधील काही कलाकार असे आहेत जे त्यांच्या वर्तणुकीमुळे अनेकांना आवडतात. अभिनेता सुनील शेट्टी त्यातीलच एक नाव. गेल्या अनेक वर्षांपासून सुनील शेट्टी मोठ्या स्क्रिनपासून दूर होता. तो काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमधून दिसला असला तरी चाहत्यांच्या मनात आजही घर करून आहे. याचाच प्रत्येय त्याच्या एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरून येतो.
सुनील शेट्टी विमानतळावरून बाहेर येत असतानाचा हा व्हिडीओ आहे. यावेळी आपल्या आई वडिलांसोबत चाललेल्या छोट्या मुलाला अण्णाने थेट आपल्या कडेवर उचलून घेतल्याचे पाहायला मिळते. यावेळी तो छोटा मुलगा न रडता, अभिनेत्याच्या कडेवर चांगलाच रमताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा चिमुकला समोर त्याची आई असताना देखील सुनील शेट्टीच्या कडेवरून उतरण्यास तयार नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.
View this post on Instagram
सुनील शेट्टीच्या या साध्य आणि सरळ स्वभावामुळॆ चाहते चांगलेच इम्प्रेस झालेत. अनेकांनी यावर अभिनेत्याचे कौतुक करत कमेंट केल्या आहेत. एका युजरने सुनील शेट्टीला अजिबात घमंड नसल्याचे सांगितले आहे. तर दुसऱ्याने आण्णा बॉलिवूडचा खरा स्टार असल्याचे म्हंटले आहे.