मुंबई – क्रिकेटर के एल राहुल आणि अभिनेता सुनील शेट्टीची कन्या अथिया शेट्टी लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यावर आता स्वतः सुनील शेट्टी यांनी भाष्य केलं आहे. ‘धारावी बँक’ या सिरीजमुळे सुनील शेट्टी सध्या चांगलाच चर्चेत आहे. यावेळी एका मनोरंजन चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
मुबईतील सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये चालणाऱ्या अवैध्य गोष्टी आणि तेथील नेक्ससवर भाष्य करणारी धारावी बँक ही सिरीज लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामधील सुनील शेट्टीने साकारलेल्या पात्राची जोरदार चर्चा आहे. बऱ्याच वर्षानंतर सुनील शेट्टी एका मोठ्या रोलमध्ये दिसणार आहे त्यामुळे चाहत्यांना देखील त्याची उत्सुकता आहे. सीरिजच्या प्रोमोमध्ये सुनील शेट्टीचा किलर लूक सर्वांना आवडला आहे. या सीरिजच्या प्रमोशनसाठी दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टीला क्रिकेटर के एल राहुल आणि अथिया यांच्या विवाहाबाबत प्रश्न विचारण्यात आला.
अथिया आणि के एल राहुल लग्न कधी करणार ? असा थेट सवाल सुनील शेट्टीला विचारला असता तो म्हणाला,’लवकरच होईल’. सुनील शेट्टीने हे उत्तर देताच याआधी देखील सुनील शेट्टीला या दोघांच्या नात्याबद्दल विचारण्यात आले होते त्यावेळी त्याने त्यांच्या रिलेशनबाबत स्पष्ट केले नव्हते. परंतु तडप चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनींग दरम्यान के एल राहुल आणि अथियाने सोबत एंट्री केल्यानंतर दोघांच्या लग्नाबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. आता सुनील शेट्टीने त्याबाबत संकेत दिले आहेत.