नवी दिल्ली – अभिनेते सुनील शेट्टी सध्या आपल्या आगामी वेब सिरीजमुळे चांगलेच चर्चेत आहेत. उत्तर प्रदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बॉयकॉट बॉलिवूडबाबत झालेल्या बातचितीषयी सुनी शेट्टीने स्पष्टपणे सांगितले. सुनील म्हणाला जेव्हा आमची भेट झाली तेव्हा मी बॉलीवूडवर बहिष्कार टाकण्याची प्रवृत्ती थांबवण्याची विनंती त्यांना केली. चर्चेनंतर मी जे बोलतोय ते बरोबर आहे, असं मुख्यमंत्र्यांनाही वाटत असल्याचं सुनील शेट्टीने यावेळी स्पष्ट केले.
भगवान श्री रामांबाबत देखील काहींनी आक्षेप घेतला होता असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.अभिनेता सुनील शेट्टी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये विविध विषयांवर यावेळी चर्चा झाल्याचे समजते. बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी सध्या त्याच्या आगामी हंटर: टूटेगा नही तोडेगा या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.
या सिरीजची सध्या जोरदार चर्चा आहे. 14 मार्चला सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्यामध्ये सुनील शेट्टी अॅक्शन अवतारात दिसत आहे.ही सिरीज 22 मार्चला प्राईम वर प्रदर्शित होणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जानेवारीत मुंबईच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा तिथल्या एका बैठकीत त्यांनी अनेक सिनेतारकांची भेट घेतली होती.त्याच वेळी, सुनील शेट्टीने त्यांना बॉयकॉट बॉलीवूड ट्रेंड आणि फिल्म इंडस्ट्रीबद्दल वाढत्या द्वेषाचा सामना करण्यास मदत करण्यास सांगितले होते. त्याचवेळी सुनील जे बोलत होते ते बरोबर होते हे मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आल्याचे सुनील शेट्टी म्हणाले.