खंडाळा – पारगांव (ता. खंडाळा) येथे एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. अधिक माहिती अशी, की केसुर्डी येथील एका कंपनीमध्ये काम करणारा युवक विनायक संजय पडवळ (वय 22, सध्या रा. पारगांव, मूळ रा. येरफळे, ता पाटण) या युवकाने भाडेतत्त्वावर राहत असलेल्या घरात दोरीने फास लावून आत्महत्या केली.
रूममध्ये राहणारे इतर मित्र कंपनीत कामासाठी जात असताना, विनायक झोपला होता. मात्र कंपनीतून ते माघारी आले तेव्हा, त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्वरीत खंडाळा पोलीस ठाण्यात कळविले. या घटनेबाबतची फिर्याद कृष्णत लक्ष्मण कुंभार यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात दिली असुन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. एस. वरे तपास करत आहेत.