नागरगावच्या तरुणाचे संशोधन ः बनला पेटेंटचा मालक
मांडवगण फराटा-शिरूर तालुक्यातील नागरगाव येथील युवा अभियंता समीर शेलार यांनी कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली आहे. त्यांनी ऊसाचा रस डबाबंद व दीर्घ काळ टिकवून ठेवण्यासाठीचे संशोधन केले असून त्यांच्या संशोधनास भारतातील पाहिले पेटेंट मिळाले आहे. उिीोळींळेप रपव िीेलशीी षीे झीशरिीरींळेप ेष ीीींरसश ीींरलश्रशर् ीीसरीलरपश र्क्षीळलश हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.
समीर शेलार यांनी हडपसर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनीरिंग चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या ह्या विशेष कामगिरीमुळे शेतकऱ्यांना ऊसाचा रस डबाबंद करून वर्षभर बाजारपेठेत विकता येईल. इंजिनीरिंग करत असताना नेहमी वाटायचे की, आपल्या शेतकऱ्यासाठी काही तरी करावे, व त्याचाच विचार करत असताना जाणवले की, राज्यात कधी ऊस जास्त पिकतो तर कधी कमी, ज्यावेळी तो जास्त होतो तेव्हा काही तरी उपाय करावेत, ह्या भावनेतून ऊस प्रक्रिया हा विषय निवडल्याचे समिर शेलार यांनी सांगितले.