मांडवगण फराटा-फार्मसी क्षेत्रात असलेले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश ढोबळे यांनी स्वखर्चाने करोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी घरोघरी जाऊन सोडियम हायपोक्लोराईड फवारणी केली. मांडवगण फराटा येथे गावातील लोकांच्या जवळपास 300 घरी जाऊन जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.
करोना आजाराबद्दल उपयुक्त माहिती सांगून लोकांमधे जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. लोकांना गरजेच्या वस्तू घरोघरी पुरवाव्यात या उद्देशाने या फार्मासिस्टने चौकामध्ये सॅनिटाइझर, घरोघरी डेटॉल साबण, मास्क अशा विषाणूपासून संरक्षण करणाऱ्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आपण म्हणतो खेड्यात करोना येणार नाही, पण हा आपला गैरसमज आहे. हा रोग शहरामध्ये अडवता येऊ शकतो, मात्र खेड्यामधे अडवता येणार नाही.