वाशिम: वाशीम जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. आज जिल्ह्यातील एकमेव बाधिताचा अहवाल निगेटिव्ह आला. सदर रुग्णाच्या 20 आणि 21 व्या दिवसानंतर घेण्यात आलेल्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
त्यामुळे आता जिल्हा कोरोनामुक्त होऊन ग्रीन झोनमध्ये स्थान मिळणार आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनसह इतर सर्वबाबी पहिल्या प्रमाणेच अंमलात राहणार आहेत, असं जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी सांगितले.
वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेला एकमेव रुग्ण 3 एप्रिलला आढळून आला होता. त्यानंतर 18 दिवसात एकही रुग्ण वाढला नसून सतर्क राहण्यासाठी लॉकडाऊनचे नियम मात्र कडक स्वरूपात लागू राहणार आहेत.