पुणे, दि. 1 -“आयएसटीडी’ या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या पुणे विभागामार्फत झील व्यवस्थापन महाविद्यालयात विद्यार्थी मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर प्रोजेक्ट स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला. केल्विन चाको हिने तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले. तिला प्रा. डॉ. आशिष व्यास यांनी मार्गदर्शन केले.
सोनल उत्तरकर व मीनल निंबर्गी यांना विभागून पारितोषिक मिळाले. त्यांना प्रा. डॉ. योगेंद्रकुमार देवकर आणि प्रा. डॉ. एकता तलवार यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी मंडळाचे केल्विन चाको या अध्यक्ष म्हणून, तसेच विशाल कांबळे उपाध्यक्ष, निकिता पाटील, सचिव व विनीत कैंची, खजिनदार या पदावर काम करतील.
यावेळी “आयएसटीडी’ पुणे विभागाचे अध्यक्ष ब्रिजमोहन मिश्रा यांनी विद्यार्थी मंडळातर्फे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने कोणते फायदे होणार आहेत, याबद्दल सांगितले. तसेच डॉ. रश्मी हेबाळकर यांनी प्रोजेक्ट स्पर्धेबद्दलची माहिती व डिप्लोमा कोर्सची माहिती दिली. डॉ. योगेशकुमार उपाध्याय यांनी करिअर मार्गदर्शन, डॉ. सचिन चव्हाण यांनी स्वागतपर भाषण केले. यावेळी डॉ. राजेश कश्यप, व डॉ. रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयन विद्यार्थिनी दीक्षा हिने केले. डॉ. आशिष व्यास यांनी आभार मानले. संस्थेचे संस्थापक संभाजीराव काटकर, सचिव प्रा. जयेश काटकर, प्रा. उद्धव शिद यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.