पुणे, दि. 27 -शिर्डी येथे झालेल्या टेनिस व्हॉलीबॉल राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पुणे शहराकडून खेळताना सब ज्युनिअर मुली प्रथम क्रमांक व सब ज्युनिअर मिक्स डबल द्वितीय क्रमांक या विजयामुळे महाराष्ट्राच्या संघामध्ये पुणे शहराच्या सहा खेळाडूंची निवड झाली. या स्पर्धेत प्रियदर्शिनी विद्यामंदिर व प्राइड इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी केली.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी एकूण 28 खेळाडूंची महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली होती.त्यामध्ये सहा खेळाडू पुणे जिल्ह्यातून निवडले गेले होते. राजवीर भोसले, ओंकार पोळ, श्रेया ढवान, तनुजा रांजणे, प्रांजल सूर्यवंशी, सायली बाटे. या स्पर्धेमध्ये 18 राज्यातील एकूण 400 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन उदगीरचे माजी आमदार गोविंद केंद्रे, महादेव कसगावडे (पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी) टेनिस व्हॉलीबॉल जनक व्यंकटेश वांगवाड, गणेश माळवे सर, प्रफुल्ल बनसोडे , दिनेश सिंगाराम यांच्या हस्ते पार पडले.
इतर खेळाडू बरोबरच प्रियदर्शिनी विद्यामंदिरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत महाराष्ट्र संघाला रजतपदक मिळवून दिले. सब जुनियर मिक्स डबल मध्ये राजवीर भोसले प्राइड इंग्लिश स्कूल व प्रांजल सूर्यवंशी प्रियदर्शिनी विद्यामंदिर संघाने तेलंगणा, केरला, झारखंड या राज्यांचा पराभव करत महाराष्ट्र संघाला रजतपदक मिळवले.
खेळाडूंना क्रीडामार्गदर्शन संदीप भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. या कामगिरीचे कौतुक मुख्याध्यापिका राजश्री दिघे, रूपाली मालुसरे व संस्थेचे सचिव मा. नगरसेवक आप्पासाहेब रेणुसे यांनी केले.