पौड – मुळशी तालुक्यात 18 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 47 उमेदवार रिंगणात उतरले असून 27 महिलादेखील नशीब आजमावत आहेत. थेट जनतेतून सरपंचपद मिळवायचे असल्याने उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सरपंचपद महिलांसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी आणि तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.
बेलावडे (सुजाता संतोष ढमाले, छाया संदीप येनपुरे), खुबवली (रोहिणी रामचंद्र ठोंबरे, वैष्णवी हनुमंत पवार), धामणओहोळ (वंदना अमोल शेडगे, सुवर्णा शिवाजी शेडगे), वळणे (अंजना जयवंत सातपुते, रोहिणी रविंद्र सोंडकर), ताम्हिणी (स्वाती निलेश चोरघे, संगीता यशवंत जाधव) या पाच ग्रामपंचायतीत सरळ लढत होत आहे.
तर कोंढावळे (पल्लवी अमित कंधारे, रंजना सागर कंधारे, सुरेखा गणपत कंधारे), मूगाव (लिलाबाई बाळू मरगळे, संगीता मारूती मरगळे, उषा वसंत वाटाणे), आंबवणे (सिता मच्छिंद्र कराळे, शारदा उल्हास मानकर, रूपाली राजेंद्र हुंडारे), शेडाणी (माया सुभाष खिलारे, रूपाली पांडूरंग ढोकळे, वर्षा प्रकाश राऊत), वेगरे (रखमाबाई मारूती कोकरे, राजश्री रामदास मरगळे, रोषणी संतोष कानगुडे) या पाच ग्रामपंचायतीत तिरंगी लढतीचे चित्र आहे. आपल्या घरातील महिला गावची सरपंच होण्यासाठी महिलांच्या कुटुंबियांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. यातून चुरशीच्या लढती होणार आहेत.