मुंबई – अभिनेता ‘सुबोध भावे’ हा एक प्रगल्भ अभिनेता आहे म्हणूनच अनेक बायोपिक करूनही त्याने आपली खास शैली जपली आहे. आजवर लोकमान्य, बालगंधर्व, डॉ काशिनाथ घाणेकर साकारलेला सुबोध भावे आता आपल्याला “संत तुकाराम’ महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. स्वतः अभिनेत्यानं या बद्दलची एक खास पोस्ट शेअर करत आपल्या आगामी सिनेमाची माहिती दिली आहे. या सिनेमाच खास वैशिष्ट्य म्हणजे सिनेमातून सुबोध भावे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुबोधचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा ठरणार आहे.
‘संत तुकाराम’ असं सुबोध भावेच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. कित्येक चाहत्यांनी त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, त्यानं देखील आपल्या पोस्ट मधून सर्वांचे आभार मानले आहेत. प्रेक्षकांनी सुद्धा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली असल्याचं दिसून येत आहे.
View this post on Instagram
अभिनेता सुबोध भावेची पोस्ट…!
आज “संत तुकाराम” या आमच्या आगामी हिंदी चित्रपटातील “तुकाराम महाराज” यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्या समोर सादर करत आहे. ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल माझे दिग्दर्शक आणि सर्वांचा मी कायमचा ऋणी आहे… माझे निर्माते आणि संपूर्ण संघाचे मनपूर्वक आभार.! आता कोठे धावे मन,तुझे चरण देखीलिया!” या आशयाची पोस्ट त्याने केली आहे.