- पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रदान
- आणखी एक कर्जत च्या शिरपेचात मानाचा तुरा
कर्जत : कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन मोहन गावडे यांना रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आंतरिक सुरक्षा पदक देण्यात आले. पोलीस दल आणि नागरिकांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सचिन गावडे यांनी 2013 मध्ये गडचिरोली (नक्षलवादी) येथे पोलीस दलात उत्तमरित्या कार्यकाळ सांभाळला. 2017 मध्ये कर्जत पोलीस ठाण्यामध्ये उपनिरीक्षक पोलीस पदावर रुजू झाले, एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात गुन्ह्यांना आळा बसला.
कर्जत तालुक्यातून आतापर्यंतच्या कार्यकाळात आपला पोलीसी खाक्या दाखवत तब्बल 22 गुन्ह्यांचा छडा लावला तसेच गुन्हेगारी क्षेत्रावर अंकुश ठेवला लॉकडाऊन काळात चौकाचौका नाकाबंदी करून टवाळखोरांवर वचक निर्माण केला. या कार्याची दखल घेत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सचिन गावडे यांना आंतरिक सुरक्षा पदक देऊन गौरविण्यात आले.