विद्यार्थी करणार स्वच्छतेचा जागर 

विद्यार्थी सांभाळणार ही जबाबदारी

शाळेत नियमित स्वच्छता मोहीम घेऊन शाळा स्वच्छ ठेवणार
स्वच्छतेचे महत्त्व पालकांना सांगून घराच्या स्वच्छतेसाठी मदत करणार
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना स्वच्छता ठेवण्याची विनंती करणार
परिसर, नातेवाईकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणार.

पुणे – महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमधील विद्यार्थी आता शहर स्वच्छतेचा प्रसार आणि जनजागृती करणार आहेत. शालेय जीवनातच त्यांना स्वच्छतेची सवय लागावी तसेच त्यांच्याकडून आपल्या पालकासह आसपासच्या परिसरातही याबाबत जनजागृती करावी या उद्देशाने या विद्यार्थ्यांना “स्वच्छता मित्र” केले जाणार आहे.

महापालिकेच्या शहरातील सुमारे 287 शाळांमध्ये सुमारे 1 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. महापालिकेकडून शहरात स्वच्छतेसाठी स्वच्छ सर्वेक्षण 2020 मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा प्रसार आणि प्रचार करण्यासह मुलांमध्ये शालेय शिक्षणापासूनच आपली शाळा, आपले घर आणि आपला परिसर स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी. तसेच मुलांच्या माध्यमातून पालकांनाही याबाबत माहिती व्हावी या उद्देशाने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ही मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.