प्राचार्य डिसोजा ः घोडेगावात अंमली पदार्थविरोधी दिनी प्रभातफेरी
घोडेगाव – प्रत्येक विद्यार्थ्यांने एका व्यक्तीला व्यसनापासून परावृत्त करण्याचा संकल्प करून तो पूर्ण केल्यास अनेक कुटुंबे सुखी होतील, असे मत प्राचार्य मेरी फ्लोरा डिसोजा यांनी व्यक्त केले.
न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. अमली पदार्थांच्या सेवनाने गंभीर परिणामाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याच्याशी लढा देण्यासाठी शाळेच्या स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी घोडेगाव शहरात प्रभात फेरी काढून विविध संदेश फलकाद्वारे, घोषणाद्वारे समाजात जनजागृती केली.
अमली पदार्थांचे दुष्परिणाम, कुटुंबावर व समाजावर त्याचा परिणाम याबाबत माहिती देण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याबाबत माहिती देखील विद्यार्थांना देण्यात आली. आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे, उपाध्यक्ष शामशेठ होनराव, कार्याध्यक्ष राजेश काळे,
संस्थेचे सचिव अक्षय काळे, इतर पदाधिकारी, संचालक तसेच उपप्राचार्या रेखा आवारी, पर्यवेक्षिका वंदना वायकर व स्काऊट गाईडचे मार्गदर्शक ज्योती रोकडे तानाजी फुलमाळी, रोहित तळेकर, गणेश मडके, तसेच सर्व स्पोर्टस कमिटीचे शिक्षक व शिक्षिका यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.