मोटार वाहन कायदा-2019 मधल्या कठोर तरतुदी (भाग-1)

मागील आठवड्यात 9 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपतींच्या सहीनंतर अमलात आलेल्या मोटार अपघात सुधारीत कायदा 2019 मधे अतिशय महत्वपूर्ण बदल केले असून अल्पवयीने मुलाकडून होणाऱ्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी कडक शिक्षेच्या तरतुदी केल्या आहेत. मुलाच्या चुकीची शिक्षा आई वडील अथवा पालक याना 25 हजार रु दंड तसेच तीन वर्षांपर्यंत कारावास, अशी महत्त्वपूर्ण तरतुद या कायद्यातील कलमात केली आहे.

मोटार अपघात सुधारीत कायदा 2019 हा राज्यसभा व लोकसभेत संमत करताना, मोटार अपघातावर नियंत्रण ठेवण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या. पिडीतांना जास्तीत जास्त भरपाई देण्याच्या व्यवस्थेसाठी विमा कंपन्याना तसेच वाहन तयार करणाऱ्या कंपन्यासाठीही अनेक कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. अल्पवयीन मुलांबाबत कलम 199 अ या नवीन कलमाचा अंतर्भाव या कायद्यात केला आहे .

या कलमानुसार जर अल्पवयीन मुलांकडून अपघात झाला, तर त्या वाहनाचा मालक अथवा त्या मुलाचे पालक यांना शिक्षेस जबाबदार धरुन, त्या मुलाला बाल गुन्हेगार कायद्याखाली शिक्षा होईल. तसेच त्याच्या पालकाना तीन वर्षांपर्यंतचा कारावास तसेच 25 हजार रुपयांचा दंड अशी तरतुद करण्यात आली आहे. त्याच बरोबर त्या मुलाला त्याच्या वयाच्या 25 वर्षापर्यंत शिकाऊ अथवा पक्का असा वाहन चालवण्याचा परवाना देखील मिळणार नाही. जर त्या मुलाकडे शिकाऊ परवाना असेल, तर त्याला शिक्षेत सुट मिळु शकते.

यातील उपकलम 4 नुसार त्या वाहनाची नोंदणी 12 महिने रद्द करण्याचे अधिकारदेखील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जर संबंधित आई वडीलांनी अथवा पालकांनी मुलाने वाहन चालवू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली, हे ते सिद्ध करु शकले, तरच त्यांना शिक्षेतून सवलत मिळू शकेल. मात्र न्यायालय अशा अपघातावेळी सबंधीत पालकाची अथवा वाहन मालकाची चुक होती, असे गृहीत धरुन शिक्षा करु शकेल.

या शिवाय मोटार अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध कलमांद्वारे कठोर उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामधे कलम 194 नुसार एखाद्या प्रवासी वाहनात अधिकृत मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशाची वाहतूक केल्यास प्रति प्रवासी दोन हजार रुपये दंडाची तरतुद आहे. जड वाहनाद्वारे अतिरिक्त वजनाची वाहने आढळल्यास प्रति टन तीन हजार रुपये दंड; तसेच 40 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतुद करणेत आली आहे.

मोटार वाहन कायदा-2019 मधल्या कठोर तरतुदी (भाग-2)

याशिवाय कलाम 194 च्या विविध उपकलमांनुसार, सीट बेल्ट न वापरता वाहन चालवल्यास एक हजार रुपये दंड, जर वाहनातून 14 वर्षांपेक्षा लहान मुलाना घेऊन जात असाल, तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी सीट बेल्ट नसेल, तर एक हजार रुपये दंड, दुचाकी चालवताना डोक्‍यावर हेल्मेट नसेल तर दोन हजार रुपये दंड आणि तीन महिने परवाना रद्द, एखादी रुग्णवाहिका अथवा अग्निशामक दलाच्या वाहनास रस्ता न दिल्यास, सहा महिन्यांपर्यंत शिक्षा व दहा हजार रुपये दंड, सिग्नलजवळ विनाकारण वाहनाचा हॉर्न वाजवला तर दोन हजार रुपये दंड; पुन्हा दुसऱ्यावेळी तसाच हॉर्न वाजवतांना आढळला तर दोन हजार रुपये दंडाची तरतुद करण्यात आली आहे. जर गॅस गळती अथवा सायलेन्सर शिवाय अन्य ठिकाणाहुन वाहन धुर फेकत असेल तर त्या वाहनाला देखील प्रथम एक हजार रुपये; दुसऱ्या वेळी दोन हजार रुपये दंड आकारला जाईल. मोटारसायकलवर दोनपेक्षा जास्त लोक प्रवास करत असतील तर सदर वाहनचालकाचा तीन महिन्यांपर्यंत परवाना रद्द करण्याचीदेखील तरतुद या कलम 194 अंतर्गत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)