दिल्ली – काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना गाडी चालवण्यासाठी दोषी ठरवत त्यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. वढेरा हे आपल्या सुरक्षा रक्षाकांच्या ताफ्यासहीत बारापुला येथून सुखदेव येथील आपल्या कार्यालयात जात असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.
The vehicle of Robert Vadra was challaned under Section 184 of The Motor Vehicles Act (Dangerous driving). Vadra was going to his office on Wednesday morning with his security personnel. Suddenly his car was hit from behind after it decelerated: Delhi Police
— ANI (@ANI) June 24, 2021
मिळालेल्या माहितीनुसार , त्यांची गाडी बारापुला पुलावरून जात असतांना अचानक गाडीने ब्रेक लावला असता मागील सुरक्षा रक्षाकांच्या गाडीला धडक दिली. यानंतर वाहतूक पोलिसांनी कारवाई करताना बेजबाबदारपणे आणि धोकादायक पद्धतीने गाडी चालवण्याच्या कायद्याअंतर्गत दंड करत पावती फाडली.
या प्रकरणामध्ये वाहतूक पोलिसांनी कारवाई करताना बेजबाबदारपणे आणि धोकादायक पद्धतीने गाडी चालवण्याच्या नियमांअंतर्गत १८४ मोटर वाहन कायद्याअंतर्गत म्हणजेच धोकादायक वाहन चालविणेसाठी दंड करत पावती फाडली.