‘करोना बाधितांना उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करा’

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे शिरूरच्या तहसीलदारांना आदेश

शिरूर दिनांक (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील शहरातील खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना का नाही? काय कारण ! असे बोलून आश्चर्य व्यक्त करत आमच्याकडे मागे लागतात. या योजनेसाठी शिरूर तालुक्यात ही योजना तातडीने सुरू कराव्यात, 50 बेड, 25 बेड असो 20 असो जे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल असेल तेथे लगेच सुरू करूयात. तुम्ही मला सांगा सुरू करू, जे रुग्णालय यास नकार देतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे तोंडी आदेश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांना दिले आहेत.

तर जे डॉक्टर कोविड केअर सेंटर येथे उपचार करण्यास नकार देत आहेत अशा डॉक्टरांवर ही कडक कारवाई करा , त्यांचे रजिस्ट्रेशन महत्वाचे असते, असेही त्यांनी यावेळी तहसीलदारांना सांगितले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे दौऱ्यावर असताना शिरूर येथून जात असताना त्यांना तहसीलदार कार्यालय येथे थांबून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केले. त्यानंतर शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांच्या वतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर शहर राष्ट्रवादीच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण, शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, मेहबूब सय्यद नगरसेवक मंगेश खांडरे, स्वप्निल माळवे राजेंद्र शिंदे यांनीही त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

त्यानंतर शहरातील राष्ट्रवादी व इतर कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेबूब सय्यद व नगरसेवक मंगेश खांडरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना शासनाने सुरू केलेली महात्मा फुले आरोग्य योजना चांगली आहे. गोरगरिबांना त्याचा फायदा होतो. परंतु, शिरूर शहरात प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी पत्र देऊनही ही योजना चालू केली नसल्याचे सांगितले. तर शिरूर येथील कोविड-१९  उपचार केंद्रामध्ये उपचार देण्यासाठी शहरातील डॉक्टरांना पत्र देऊनही हे डॉक्टर या सेंटरमध्ये उपचार करण्यास नकार देत असल्याचे सांगितले.

यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शिरूर शहरात महात्मा फुले आरोग्य योजना सुरु नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करून ज्या खाजगी हॉस्पिटल येथे ही योजना सुरु करायची असेल तेथे आपण लगेच सुरू करू असे सांगून या योजना सुरु करण्यास नकार देणार्‍या हॉस्पिटल यांच्यावर कडक कारवाई करा. तसेच जे डॉक्टर उपचार करण्यासाठी पत्र देऊ नयेत. त्या खाजगी डॉक्टरांवर कारवाई करा, असा आदेश शिरूरच्या तहसीलदार यांना आरोग्यमंत्री टोपे यांनी दिला.

यावेळी शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी हॉस्पिटल व डॉक्टर यांना नोटीस काढल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.