पेठ परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव

महिला, लहान मुलांसह नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

पेठ – पेठ (ता. आंबेगाव) परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक, महिला व लहान मुलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले अनेक दिवसांपासून मोकाट कुत्री या परिसरात फिरत आहेत. रात्रीच्या वेळी ही कुत्री घरासमोरील ओट्यावर बसून घाण करतात.

सकाळ व संध्याकाळी ही कुत्री एकसाखी भटकत असतात, त्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. या परिसरात 20 ते 25 कुत्री ही एकत्र भटकत असतात. येथील दुचाकी, सायकलस्वार या परिसरातून जात असताना या कुत्र्यांचा फौजफाटा अंगावर धावून जातो. त्यामुळे येथील अनेक तरुण अपघातात जखमी झालेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. ही मोकाट कुत्री लहान मुले, नागरिकांना चावत असल्याचे समोर आले आहे. वाहनचालकही या कुत्र्यांच्या हल्ल्याचे शिकार ठरत आहेत. पेठ परिसरातील रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या अनेक तरुणांच्या आणि महिलांच्या मोटारसायकलचा पाठलाग करत आहेत.

194 जणांनी घेतली लस – 
निव्वळ एप्रिल 2019 ते 10 डिसेंबर 2019 या कालावधीत 194 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्या 194 रुग्णांनी पेठ येथील ग्रामीण रुग्णालयात रेबीजची लस घेतली आहे. या वरून कुत्र्यांनी या परिसरीत मोठ्या प्रमाणात धूमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)