महेश जाधव
शैक्षणिक संस्था असल्याने पोलीस स्टेशन गरजेचे
मायणीमध्ये माध्यमिक विद्यालये, ज्यूनिअर कॉलेज, सीनियर कॉलेज, डी फार्मसी कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय तसेच खासगी इंग्लिश मीडियम स्कूल व स्वतंत्र कन्या शाळा असल्यामुळे मुलींची संख्या अधिक आहे त्यामुळे याठिकाणी पोलीस स्टेशन होणे गरजेचे आहे.
मायणी – जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या मायणी गावात पोलीस स्टेशन व्हावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून मायणीकर करत होते, याला लवकरच मुहूर्तमेढ मिळणार असून संबंधित विभागाकडून मायणी पोलीस स्टेशन करण्यासाठी लागणारी अत्यावश्यक गोपनीय माहिती मागवण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे. त्यामुळे लवकरच मायणी पोलीस दूरक्षेत्राचे मायणी पोलीस स्टेशनमध्ये रुपांतर होणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
याबाबत अधिक माहिती जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून मायणीची ओळख आहे. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती गावात असलेल्या गावांपैकी एक गाव आहे. या ठिकाणी माध्यमिक विद्यालये, ज्यूनिअर कॉलेज, सीनियर कॉलेज, डी फार्मसी कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय तसेच खासगी इंग्लिश मीडियम स्कूल आहे. तसेच सध्याच्या मायणी पोलीस दूरक्षेत्राचे हद्दीत सुमारे साठ किलोमीटरचा राज्यमार्ग नियोजित राष्ट्रीय महामार्ग आहे.
तसेच दोन घाट मार्गही आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी, राजकीय संघर्ष, घरफोड्या, अपघात होत असतात. त्यामुळे याठिकाणी पोलीस स्टेशन करावे अशी मागणी मायणी ग्रामस्थांकडून गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे. मात्र या मागणीला मुहूर्तमेढ मिळत नव्हती मात्र गेल्या महिन्यापासून पोलीस विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातून मायणी पोलीस दूर शेत्रातील विविध गुन्ह्यांचे रेकॉर्ड मागवण्यात आले होते तसे रेकॉर्ड वडूज पोलीस स्टेशन मधून देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे येत्या एक-दोन महिन्यांमध्ये वरिष्ठ पातळीवरून मायणी पोलीस स्टेशन करण्याबाबत हालचाली होऊन मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस स्टेशन मध्ये रूपांतर होईल अशी आशा मायणीकरांना आहे.