कारभारी (आण्णा) सातव या नावाचं मोठं वलय बारामतीत आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचे नातू प्रशांत (नाना) सातव विविध क्षेत्रात वैशिष्ट्य्पूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत असतात. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याच्या उद्देशाने बारामती शहरापासून 1 किमी अंतरावर, म्हसोबा मंदिराजवळ अभ्यासक्रमावर आधारित उपक्रमशील अशा इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली. या शाळेने अल्पावधितच पालकांचा विश्वास संपादन केला आहे. सतत नावीन्यपूर्ण उपक्रम देत शाळा प्रगतीपथावर राहील, असा विश्वास आहे. दैनिक प्रभातच्या वर्धापनदिनानिमित्त प्रशांत (नाना) सातव यांच्याशी साधलेला हा संवाद…
शाळा म्हटलं की वह्या-पुस्तकं आणि अभ्यास एके अभ्यास हा ट्रेंड अलीकडच्या काळात बदलत चालला आहे. या बदलासोबत सुरुवातीपासूनच आपली नाळ जोडणारी आणि अल्पावधितच लोकप्रिय झालेली बारामती शहरातील कारभारी आण्णा इंग्लिश मीडियम स्कूल!
या शाळेत अभ्यासाबरोबरच विविध अभ्यासपूरक उपक्रम राबविले जातात. यामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधला जातोच. त्याबरोबर सर्वांगिण विकास होतो. यासाठी उत्तम आरोग्य गरजेचे असते. या उद्देशाने विविध खेळ घेतले जातात. सर्व विद्यार्थी सूर्यनमस्कार व योगासनेही करतात. कराटे, कुस्ती, कबड्डी, लाठी -काठी इ. खेळांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.
विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता अधिक प्रखर व्हावी या उद्देशाने प्राणायाम, संस्कार वर्ग असे उपक्रम होतात. इंग्रजी माध्यमात राहूनही आपली संस्कृती व संस्कार सोबत घेऊन जाण्याची शिकवण शाळेकडून दिली जाते.
कला हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. याचा विचार करून चित्रकला, हस्तकला यांचेही प्रशिक्षण दिले जाते. नियमित वेळापत्रकात संगीत-गायन, वादन यांचीही आवड जोपासली जाते.
सारंग संगीत विद्यालयाच्या माध्यमातून बारामती पंचक्रोशीतील आबालवृद्धांना गायन, वादन, नृत्य इत्यादींचे शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे कुटुंबीयही विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेत सक्रिय सहभागी होतात .जसे आजी-आजोबा मेळावा ,पालक भेटी, मातृदिन,रामायण कथा इत्यादी.
अशा रितीने अभ्यास-कला-क्रीडा-संस्कार यांचा अनोखा संगम जेथे पाहावयास मिळतो, असे कारभारी आण्णा इंग्लिश मिडीयम स्कूल आण्णांच्या प्रेरणा व आशीर्वादातून साली विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेल्या या शाळेत सध्या नव्या दमाचे विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत आहेत.
तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने या उक्तीला साजेसे असे शिक्षण ज्यामुळे पंखात बळ घेऊन भरारी घेणारे विद्यार्थी या ज्ञानमंदिरात घडतील असा विश्वास वाटतो. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम शाळेच्या माध्यमातून राबविले जातील. फाउंडेशनच्या कामात अध्यक्ष सुधीर भोंगळे, स्कूल कमिटी अध्यक्ष हणमंत मोहिते यांच्यासह या क्षेत्रातील मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळत असल्याने शाळेचा प्रवास प्रगतीपथावर असल्याची भावना प्रशांत(नाना) सातव यांनी व्यक्त केली.
अनोखा उपक्रम : वॉटर बेल
पाणी कमी पिणे म्हणजे आजारांना निमंत्रण देणे . हे टाळण्यासाठी वॉटर बेल हा उपक्रम शाळेत सुरू करण्यात आला आहे. ठरावीक वेळेनंतर पाणी पिण्यासाठीची बेल वाजते. ती वाजली की विद्यार्थी पाणी पितात. या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक होत असल्याचं मुख्याध्यापिका संगीता व्यास यांनी सांगितलं.
दूरदृष्टी लाभलेलं नेतृत्व प्रशांत (नाना)सातव
आजोबा कारभारी आण्णा सातव आणि वडील पांडुरंग सातव यांच्या रूपानं सातव कुटुंबाला समाजकारण आणि राजकारणाचा मोठा वारसा मिळालाय. सहजपणे राजकारणात येणं शक्य असतानाही प्रशांतनाना सातव यांनी प्रशासकीय सेवेची वाट चोखाळली. राज्यसेवेच्या परीक्षेतून ते मध्ये विक्रीकर निरीक्षक झाले. मध्ये विक्रीकर अधिकारी झाले आणि मध्ये ते साहाय्यक विक्रीकर अधिकारी या पदापर्यंत पोहोचले. वर्षांहून अधिक काळ प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवल्यावर प्रशांतनाना यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेत मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून राजकारणात ते सक्रिय आहेत.
कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशनचे उपक्रम
प कारभारी प्रीमिअर लीग स्पर्धा प तुलसी रामायण व आध्यात्मिक महोत्सव प महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धांचे आयोजन प 24 तास रुग्णवाहिका सेवा प रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबीर प अभ्यासिका प व्यायामशाळा प राष्ट्रीय गुणवत्तेचे खेळाडू घडण्यासाठी दहा मीटरची शूटिंग रेंज प बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
शाळेची वैशिष्ट्य्े
पसर्वांत कमी फी असलेली बारामतीमधील एकमेव शाळा
पइंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण
पस्वतंत्र कॉम्प्युटर लॅब, अत्याधुनिक सोयीसुविधा
पप्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतंत्र लक्ष
फाउंडेशनला भविष्यात करावयाचे शैक्षणिक उपक्रम
पस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून यूपीएससी/एमपीएससी प्रशिक्षण केंद्र
पशास्त्र, वाणिज्य आणि कला माध्यमाचे कॉलेज
पकौशल्यविकास आणि उद्योजकता विकास होण्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम
नर्सरीपासून आरटीई प्रवेश देणारी पहिली शाळा
आरटीईच्या माध्यमातून पहिलीपासून प्रवेश दिले जातात. मात्र कारभारी अण्णा चारिटेबल फाऊंडेशनच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीपासूनच प्रवेश दिले जात आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे.
– प्रशांत (नाना) सातव
स्नेहसंमेलनात अतुल्य भारत
विद्यार्थ्यांना भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन व्हावे यासाठी स्नेहसंमेलनात अतुल्य भारत ही संकल्पना साकारली गेली . भारतातल्या प्रत्येक राज्याची संस्कृती, भाषा, त्या राज्यातली प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व या गोष्टींची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही अतिशय उत्साहानं सादरीकरण केलं.
– संगीता व्यास, मुख्याध्यापिका
संकलन: प्रमोद ठोंबरे
बारामती