पुणे: पुणे शहरात कंटेनमेंट झोन वगळता इतर भागास कडक संचारबंदीतुन शिथिलता मिळताच दारूचे दुकाने उघडण्यापूर्वीच शेकडो तळीरामांनी गर्दी केली. तळीरामांच्या रस्त्यावर रांगा लागल्याचे चित्र सकाळपासून पाहायला मिळत आहे. नारायण पेठेतील वाईन शॉप समोर तळीरामांनी तुफान गर्दी केली. त्यामुळे पोलिसांना दुकान बंद करावे लागले.