Share Market Today: भारतीय शेअर बाजार आज बुधवारी (27 मार्च) रोजी हिरव्या रंगात बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या हेवीवेट समभागांच्या वाढीमुळे आज सेन्सेक्स 526 अंकांनी वाढून बंद झाला. तर निफ्टी 22,100 च्या वर बंद झाला. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे 1.13 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
आजच्या व्यवहारात पॉवर, रियल्टी, बँकिंग आणि वाहन समभागांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. दुसरीकडे, आयटी आणि धातू समभागांमध्ये घसरणीचा कल दिसून आला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.01 टक्के आणि 0.70 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
व्यवहाराच्या शेवटी, BSE सेन्सेक्स 526.02 अंकांनी किंवा 0.73% ने वाढून 72,996.31 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 118.95 अंकांच्या किंवा 0.54% च्या वाढीसह 22,123.65 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी ₹1.13 लाख कोटी कमावले –
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 27 मार्च रोजी 383.70 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच मंगळवार 26 मार्च रोजी 382.57 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.13 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.13 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 19 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) च्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.60% वाढ झाली आहे. यानंतर मारुती सुझुकी 2.16%, बजाज फायनान्स 1.63%, टायटन 1.65% तर अॅक्सिस बँकेचे शेअर्स 1.23% पर्यंत वाढले.
सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 समभाग –
सेन्सेक्समधील उर्वरित 11 समभाग आज घसरणीसह बंद झाले. त्यातही विप्रोचे शेअर्स 1.57 टक्क्यांनी घसरून सर्वाधिक घसरले. तर , टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) 1.02, एचसीएल टेक 1.02, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) 0.81, तर नेस्ले इंडियाचे समभाग 0.79 टक्क्यांनी घसरून लाल रंगात बंद झाले.
खाली दिलेल्या चित्रात तुम्ही इतर सेन्सेक्स समभागांची स्थिती पाहू शकता-
2,311 समभाग घसरले –
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर आज शेअर्सची संख्या वाढीच्या तुलनेत घसरणीसह बंद झाली. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,949 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,526 शेअर्स वाढीसह बंद झाले. 2,311 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 112 समभाग कोणतेही चढउतार न होता समभाग बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 129 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला. तर 153 समभागांनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.