Arvind Kejriwal Arrest । Us Protest : गेली अनेक वर्षे दिल्लीतील केजरीवाल यांचे सरकार एका दुष्टचक्रात अडकले आहे. त्यांना कामच करू न देण्याचा जणू चंगच केंद्र सरकारने बांधला आहे की काय, असे वाटावे अशी ही स्थिती आहे. । Arvind Kejriwal Arrest । Us Protest
केजरीवाल सरकारच्या अधिकारांवर गेल्या अनेक दिवसांपासून केंद्राने गदा आणली आहे. त्यांना स्वतंत्र कारभार करताच येणार नाही अशी व्यूहरचना केंद्राने केली असल्याचं सतत बोललं जातं. सध्या मुख्यमंत्री केजरीवाल ईडीच्या कोठडीत आहेत. Arvind Kejriwal Arrest । Us Protest
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी, 21 मार्चला संध्याकाळी अटक केली. त्यांची अटक अशा वेळी झाली आहे जेव्हा देशात काही दिवसांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यांच्या अटकेवर परदेशातून प्रतिक्रिया येत आहेत.
जर्मनीनंतर अमेरिकेने देखील केजरीवाल यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली. भारतातील विरोधी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर लक्ष ठेऊन आहोत, असं अमेरिकेने म्हटलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते म्हणाले की,
“मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेच्या रिपोर्ट्सवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. त्यांच्या विषयात निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेनुसार कायदेशीर प्रक्रियेच पालन होईल अशी अपेक्षा करतो.” असं ते म्हणाले आहेत. । Arvind Kejriwal Arrest
दरम्यान, आता अमेरिकेच्या या टिप्पणीनंतर भारताने बुधवारी (27 मार्च) अमेरिकेच्या उपराजदूत ग्लोरिया बेरबेना यांना बोलावून घेत यासंदर्भात तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, “भारतातील काही कायदेशीर कार्यवाहीबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या टिप्पण्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो.
India strongly objects to the remarks of the US State Department Spokesperson:https://t.co/mi0Lu2XXDL pic.twitter.com/pa9WYNZQSi
— Randhir Jaiswal (@MEAIndia) March 27, 2024
इतरांच्या सार्वभौमत्वाचा आणि अंतर्गत बाबींचा आदर करणे अपेक्षित आहे. भारताच्या कायदेशीर प्रक्रियांवर आणि एक स्वतंत्र न्यायव्यवस्था जी वस्तुनिष्ठ आणि वेळेवर निकालासाठी वचनबद्ध आहे. त्यावर आक्षेप घेणे अयोग्य आहे”, अशा शब्दात भारताने आक्षेप नोंदवला.
अन् भारतने जर्मनीला सुनावलं –
या सगळ्या प्रकरणाशी निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असं जर्मनीने म्हटलं आहे. केजरीवाल यांना कुठल्याही अडथळ्याशिवाय आपले कायदेशीर अधिकार मिळाले पाहिजेत. भारताने जर्मनीच्या या वक्तव्यावर तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला होता.
भारताने जर्मनीच्या राजदूताला बोलवून घेत नाराजी प्रगट केली. जर्मन मिशनचे डेप्युटी चीफ जॉर्ज एनजवीलर यांना बोलवून भारताने आपला निषेध नोंदवला. । Arvind Kejriwal Arrest