Stock Market : शेअर बाजारात नफेखोरी; निर्देशांकामध्ये माफक घट

मुंबई – गुरुवारी जोरदार खरेदी होऊन शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर गेल्यानंतर आज सकाळच्या सत्रातही बरीच खरेदी झाली होती. मात्र काही गुंतवणूकदारांनी दरम्यानच्या काळात नफेखोरी केल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकात माफक घट नोंदली गेली.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 125 अंकांनी कमी होऊन 59,015 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 44 अंकांनी कमी होऊन 17,585 अंकांवर बंद झाला.

टाटा स्टील, स्टेट बॅंक, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर कोटक बॅंक, भारती एअरटेल, एचडीएफसी बॅंक, मारुती, ऍक्‍सिस बॅंक, नेस्ले या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.

याबाबत केपीएल सिक्‍युरिटीजचे संशोधन प्रमुख एस रंगनाथन यांनी सांगितले की, शेअर बाजार निर्देशांक सध्या उच्चांकी पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत. जीएसटी परिषदेची बैठक चालू असतानाच काही गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्यामुळे शेअर बाजार निर्देशांक कमी झाले. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येऊनही भारतीय शेअर बाजारात दुपारच्या सत्रात बरीच विक्री झाली असल्याचे दिसून आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.