भडोच (गुजरात) – आपल्याला यु- ट्युबकडून महिन्याला चार लाख रुपयांची रॉयल्टी मिळते असे केंद्रीय महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले. नितीन गडकरी यांची बरीच भाषणे यु -ट्युबवर अपलोड केली जातात. जगभरातून ही भाषणे पाहिली जातात. त्यामुळे ही रॉयल्टी मिळते असे गडकरी यांनी सांगितले.
मुंबई- दिल्ली एक्सप्रेस वेची पाहणी केल्यानंतर प्रकाराशी बोलताना गडकरी म्हणाले की, लॉक डाऊनच्या काळामध्ये आपण घरी स्वयंपाक करण्याबरोबरच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बरीच भाषणे केली. यामध्ये 950 भाषणांचा समावेश आहे. ही भाषणे यु ट्युबवर अपलोड केल्यानंतर जगभरातून ही भाषणे पाहिले जातात. त्यामुळे आपल्याला यु ट्युबकडून महिन्याला चार लाख रुपये रॉयल्टी मिळते.