Stock Market : निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर

शेअर बाजारात जोरदार खरेदी चालूच

मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक ( stock market news today ) सध्या आवश्‍यकतेपेक्षा जास्त उच्च पातळीवर असल्याची शंका बरेच विश्‍लेषक व्यक्त करीत असतानाही गुंतवणूकदारांकडून मात्र जोरदार खरेदी चालूच आहे. परिणामी गुरुवारी शेअर बाजार निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा ( bombay stock market news )  निर्देशांक सेन्सेक्‍स 223 अंकांनी म्हणजे 0.48 टक्‍क्‍यानी वाढून 46,890 अंकावर बंद झाला तर ( national stock exchange ) राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ( nifty ) 58 अंकांनी वाढून 13,740 अंकावर बंद झाला.

शेअर बाजार आवश्‍यकतेपेक्षा जास्त उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज आहे असा सल्ला बरेच विश्‍लेषक देत आहेत.

भारताची अर्थव्यवस्था बळकट असल्याचे संकेत विविध पतमानांकन संस्थाकडून मिळत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक वाढवीत असल्याचे वातावरण आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.