महाराष्ट्र सदनात बसणार लोकमान्य टिळकांचा पुतळा

पुणे – दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात आता लोकमान्य टिळक यांचा पुतळा राज्यशासनाकडून लवकरच बसविण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्यता दिल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी दिली.

लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान लक्षात घेता, त्यांचा पुतळा महाराष्ट्र सदनात असावा, अशी मागणी महापौर मुक्‍ता टिळक यांच्यासह अनेक स्वयंसेवी संस्थांनी पत्र पाठवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पुढील काही महिन्यांत हा पुतळा बसणार असल्याचे महापौर म्हणाल्या.
महाराष्ट्र सदनात लोकमान्य टिळकांचा पुतळा नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा पुतळा बसविण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्यांनी त्यास मान्यता दिली. 2019-2020 हे लोकमान्य टिळकांचे स्मृतीशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यामुळे या निर्णयाचा विशेष आनंद आहे.
– मुक्‍ता टिळक, महापौर, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)