नवी दिल्ली – प्राप्ति करदात्यासाठी विवरण सादर करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. 26 डिसेंबरपर्यंत देशातील 4.51 कोटी करदात्यांनी आपले विवरण सादर केले आहे.
उरलेल्या काळातही करदात्यांनी आपले विवरण लवकर सादर करावे असे आवाहन प्राप्तिकर विभागाने करदात्यांना केले आहे. गेल्या वर्षी अखेरच्या तारखेपर्यंत 5 कोटी 95 लाख करदात्यांनी विवरण सादर केले होते.
यावर्षी विवरण सादर करताना प्राप्तिकर दात्यांना काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे विवरण सादरीकरणाची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. आता प्राप्ती करदात्यांना विवरण सादर करताना कसलाही त्रास होत नसल्याचे कर विभागाकडून सांगण्यात आले.