दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा झील महाविद्यालया तर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा १ फेब्रुवारी २०२० रोजी झील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केली आहे. स्पर्धेचे विषय हे अनेक स्पर्धकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. भारत आमचा तुमचा आणि त्यांचा, चित्रपट मालिका इतिहास की अतिशयोक्ती?, शाश्वत विकास आणि पर्यावरण,सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला?,विद्यार्थी विद्यापीठे आणि आंदोलने,तेजस्वी अभिनयाचा सूर्य पाहिलेला माणूस –डॉ श्रीराम लागु, मार्क्स , गांधी आणि आंबेडकर यांच्या संकल्पनेतील समाजव्यवस्था. हे या स्पर्धेचे विषय आहेत.
त्यामुळे वक्त्यांबरोबरच श्रोत्यांसाठी सुद्धा ही वक्तृत्व स्पर्धा आनंदाची पर्वणी ठरेल .स्पर्धेसाठी संयोजन समितीला संस्थेचे सेक्रेटरी श्री.जयेश काटकर ,कार्यकारी संचालक श्री.प्रदीप खांदवे, झील अभियांत्रिकी महविद्यालाचे प्राचार्य श्री. अजित काटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. १ फेब्रुवारी सकाळी १०:३० वाजेपर्यंत स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरु असेल.
नाव नोंदणीसाठी संपर्क – ९५५२११४५८४,९१५६९६४४९८
– राज देशपांडे,
कॉलेज रिपोर्टर,
झील इंजिनीअरिंग कॉलेज, नऱ्हे