पाॅटचेफस्ट्रूम : सलामीवीर यशस्वी जैसवाल, अथर्वा अन्कोलेकर यांची अर्धशतकी खेळी आणि कार्तिक त्यागी, आकाश सिंह यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आॅस्ट्रेलियावर ७४ धावांनी मात केली. या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
The Semifinal Awaits For #TeamIndia! 👏👏
Kartik Tyagi scalps four wickets while Yashasvi Jaiswal and Atharva Ankolekar score fifties as India U19 reach the final four of #U19CWC. #INDvAUS
Report 📰 👉 https://t.co/N7vrhvYDmF pic.twitter.com/3swzNM4kFE
— BCCI (@BCCI) January 28, 2020
विजयासाठी २३४ धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाचा डाव ४३.३ षटकांत १५९ धावसंख्येवर आटोपला. आॅस्ट्रेलियाकडून सॅम फैनिंगने सर्वाधिक ७५, लिएॅम स्काॅटने ३५ आणि पैट्रिक रोवेने २१ धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
Super League Quarter Final 1. 43.3: WICKET! M Willans (2) is out, b Akash Singh, 159 all out https://t.co/woQME0elUY #INDvAUS #U19CWC
— ICC Live Scores (@ICCLive) January 28, 2020
भारताकडून कार्तिक त्यागीने ८ षटकात २४ धावा देत सर्वाधिक ४ तर आकाश सिंहने ८.३ षटकांत ३० धावा देत ३ गडी बाद केले. रवि बिश्नोईने ९ षटकांत २६ धावा देत १ गडी बाद केला.
Super League Quarter Final 1. Toss won by Australia Under 19s, who chose to field https://t.co/woQME0elUY #INDvAUS #U19CWC
— ICC Live Scores (@ICCLive) January 28, 2020
तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होते. त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद २३३ धावा केल्या. भारताचे प्रमुख फलंदाज दिव्यांश सक्सेना (१४), तिलक वर्मा (२) आणि प्रियम गर्ग (१५) हे लवकर बाद झाले. त्यानंतर यशस्वी जैस्वालने ६२, सिध्देश वीरने २५, रवी बिश्नोईने ३० आणि अथर्वा अन्कोलेकरने नाबाद ५५ धावांची खेळी करत ५० षटकांत संघाची धावसंख्या २३३ पर्यंत नेली.
Yashasvi Jaiswal’s 62, Atharva Ankolekar's unbeaten 55 guide India U19 to 233/9 against Australia U19 in the #U19CWC quarterfinals.
Will the India U19 bowlers manage to defend the total? 🤔🤔
Follow it live 👉👉 https://t.co/7oEwkycsgb#INDvAUS pic.twitter.com/CJ9VTSaiNM
— BCCI (@BCCI) January 28, 2020
आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत कोरी कैली आणि टाॅड मर्फीने प्रत्येकी २ गडी बाद केले तर मैथ्यू विल्लंस, कोन्नोर सुली आणि तनवीर संघने प्रत्येकी १ गडी बाद केला.